महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हयामधील वाढत्या उष्णतेच्या तणावामुळे निर्माण होणारी असुरक्षितता

भारतात उष्णतेची लाट ही साधारण उन्हाळाच्या महिन्यांमध्ये (एप्रिल-मे) दिसून येते. मागील काही वर्षांपासून उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ही भारतातील काही भागांमध्ये वाढतच चाललेली आहे. सन २००१ ते २०१२ च्या एकूण नेसर्गिक आपत्तीच्या मृत्यू संदर्भार्तील आकडेवारी (तक्ता क्र. १) पाहता जवळजवळ ४% लोकांचा मृत्यू हा उष्माघातामुळे झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून उष्माघातामुळे मृतांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मते, मागील अर्ध-शतकापासून (१९६१-२०१०) “उष्णतेच्या लाटेच्या ” वारंवारतेत एक तृतीयांशने वाढ झाली आहे . सरासरी जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे, गरम दिवसांच्या संख्येत वाढ, उष्णतेच्या लाटेची आणि दिवसातील तापमान यामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यूदरात ही वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच, मानवी आरोग्यावर उष्णता तणावाचे परिणाम ही भारतात चिंतेचा विषय बनत आहेत.

उष्णता तणाव दर्शविणारे पर्यावरणातील घटक म्हणजे तापमान, वायुमार्ग (हवेचा वेग), आर्द्रता आणि किरणे हे पर्यावरणातील महत्वाचे घटक आहेत. त्याचप्रमाणे घराच्या आतील घटक उदाहरणार्थ घराचा प्रकार, घराच्या छपराचा प्रकार, घराची भिंत या शैलीद्वारे प्रभावित आहेत आणि वातानुकूलित करण्यासाठी वापरण्यात येणारी साधने – पंखा, कुलर, त्याच प्रमाणे कामाचा प्रकार, त्याच प्रमाणे शारिरीक कामकाज आणि व्यक्तीचे वर्तन व वय आणि शाररिक आरोग्य हेही महत्वाचे घटक आहेत. उष्णतेची तीव्रता ही व्यक्तींच्या वैयक्तिक घटकांवरती सुद्धा अवलंबून असते. कारण या सर्व बाबींवर व्यक्तींची संवेदनशीलता ठरवण्यात येते.

Download Book: 
PDF icon Yavatmal_Heat_Study_Policy_Brief_Marathi_ASSAR_ 061218.pdfPDF icon Jalna_Heat_Study_Policy_Brief_Marathi_ASSAR.pdf